राजमाता-शिक्षक कॉलनीचा चेहरामोहरा बदलणार;अंतर्गत रस्त्यांना पेव्हिंग ब्लॉक तर ओपन स्पेसचे काँक्रिटीकरण करणार नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांची मोठी ग्वाही;गणेशोत्सव स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विकासकामांचा निर्धार..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नागापूर येथील राजमाता-शिक्षक कॉलनीच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊन संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाईल,अशी ठाम ग्वाही नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी दिली.गणेशोत्सवानिमित्त कॉलनीत आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला,त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी कॉलनीचे अध्यक्ष संघर्ष साळवे यांनी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.यावेळी कॉलनीतील प्रलंबित विकासकामे व मुलभूत सुविधांबाबतचे निवेदन नागरिकांच्या वतीने नगरसेवकांना सुपूर्द करण्यात आले.निवेदनाचा सकारात्मक स्वीकार करत नगरसेवक वाकळे म्हणाले की, “राजमाता-शिक्षक कॉलनीच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील.परिसरातील ओपन स्पेसचे दर्जेदार काँक्रिटीकरण करणे तसेच कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मजबूत पेव्हिंग ब्लॉक बसवून परिसराचे रूपडे बदलले जाईल.यावेळी अध्यक्षीय मनोगतात संघर्ष साळवे म्हणाले की, “आम्ही सर्व रहिवासी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत.
निरर्थक राजकारणात वेळ घालवण्यापेक्षा कॉलनीच्या शाश्वत विकासावरच आमचा भर आहे आणि तो आम्ही पूर्ण करून दाखवू.”या दिमाखदार सोहळ्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) माहिती व जनसंपर्क अधिकारी तथा कॉलनीचे सहअध्यक्ष पुरुषोत्तम सांगळे आणि सचिव दिलीप लेकुरवाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाला कॉलनीचे उपाध्यक्ष राजाभाऊ मोहिते, दिलीप दरंदले,हिरालाल सोनवणे,ईश्वर जायभाये,महेश नारखेडे,संदीप रोकडे,राजू नारखेडे,सविता सांगळे,मयुरी सोनवणे,श्रीमती गर्जे, सपना नऱ्हे,पूनम नारखेडे,काजल भिसे,संगीता लेकुरवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक,महिला भगिनी व बाल-गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती साळवे यांनी केले,तर शेवटी विश्वनाथ कदम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
