“बाळाची सुवर्णमयी आठ वर्षे” उपक्रमांतर्गत पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पालक मेळावा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-महाराष्ट्र शासनाच्या नवीन महत्वकांक्षी मोहीमेसाठी
“बालपणीचा प्रारंभिक विकास ” ( ECD-Early child development) मिशन अंतर्गत बाळाची सुवर्णमयी आठ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.आनंद भंडारी व जिल्हापरिषद अहिल्यानगर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.बापुसाहेब नागरगोजे यांच्या आव्हानानुसार,
आरोग्य विभागाच्या निर्देशाकांप्रमाणे
“बालपणीचा प्रारंभिक विकास” ( ECD-Early child development) मिशन अंतर्गत बाळाची सुवर्णमयी आठ वर्षे या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हिवरगाव पावसा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत शनिवारी सकाळी दहा वाजता पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वय वर्ष शून्य ते आठ वर्षे वयोगटातील बालकांच्या पालकांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या मार्गदर्शन शिबिरास हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर मार्गदर्शन करणार आहे.बाळाच्या पहिल्या ८ वर्षापैकी बाळाच्या गर्भधारणेपासून ते जन्मानंतरच्या पहिल्या २ वर्षापर्यंतचा १००० दिवसांचा कालावधी होय. यामध्ये साधारण गर्भधारणेचे ९ महिने, सुमारे २७० दिवस, जन्मानंतरची पहिली २ वर्षे सुमारे ७३० दिवस, असे एकूण १००० दिवस महत्त्वाचे दिवस आहेत.या काळात बाळाच्या मेंदूची वाढ, शारीरिक वाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि भविष्यातील आरोग्याचा पाया मजबूत होतो. या काळात गर्भावस्थेतील मातृपोषण, आईचा संतुलित आहार व आवश्यक तपासण्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह/फॉलिक अॅसिड इत्यादी पूरक आहार घेणे महत्वाचे आहे.
बाळाची ०३ वर्षे सर्वाधिक महत्वाचा काळ असतो,
बाळाच्या ३-६ वर्षे वयाच्या कालावधी हा त्याच्या शिकण्याची भक्कम पायाभरणी होऊन बाळाची प्रत्येक वस्तुमध्ये उत्सुकता (curacity) वाढुन खेळाची आवड निर्माण होण्याचा कालावधी असतो.
बाळाच्या वयाची ६-८ वर्षे हा संक्रमणाचा कालावधी असतो, सदर कालावधीमध्ये बाळास शाळेत जाणे कधी मजेशिर वाटते तर कधी आव्हानात्मक वाटते.गर्भधारणेपासून बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतच्या १००० दिवसांत माता व बालकाच्या आरोग्य, पोषण, वाढ आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सेवा व काळजी सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.बालकाची वाढ, पोषणस्थिती व विकासात्मक टप्प्यांचे नियमित निरीक्षण करणे. लसीकरण, आरोग्य तपासणी व आजारांचे लवकर निदान करुन त्यावर योग्य उपचार करणे.कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय करणे, पालक व कुटुंबामध्ये पोषण, आरोग्य आणि बालविकासाबाबत जागरूकता निर्माण करणे. बालकाच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, भावनिक व सामाजिक विकासाचा पाया मजबुत करणे.“बाळाची सुवर्णमयी ८ वर्षे” या उपक्रमांतर्गत पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सागर लोहार व आरोग्य सेविका श्रीमती नेहे, श्रीमती मुन्तोडे,अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच आशाताई प्रयत्न करत आहेत. तरी हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या केंद्राच्या कार्यक्षेत्रामधील गरोदार माता व स्तनदा माता तसेच ज्या मातांना ८ वर्षापर्यंतच्या बालकांच्या आई-वडिलांनी आरोग्य केंद्र येथे उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन समुदाय आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. सागर लोहार यांनी केले आहे.
