अहमदनगर जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांना पाऊल ठेवू देणार नाही वंचित बहुजन आघाडी आक्रमक
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१०.डिसेंबर):-महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपार कष्टाने इथल्या वंचित शोषित गोरगरीब बहुजन वर्गाला शिक्षणाची दारे खुली झाली.मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवले होते.त्यांच्याशी महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून बहुजनांची गुलामगिरीतून मुक्तता केली अशा बहुजनांचे उद्धारकर्ते आदरस्थान असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री यांनी वादग्रस्त वक्तव्य करून मनुवादी प्रवृत्तीला समर्थन दिले आहे.त्यांनी त्वरित महापुरुषांची केलेली बदनामीमुळे फुले शाहू आंबेडकर विचारांचे लोकांची जाहीर माफी मागावी अन्यथा महापुरुषांचे अनुयायी अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर त्यांना महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने देण्यात आला आहे.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालविल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे हे वक्तव्य मनुवादी प्रवृत्तीच्या विचारांचे असल्याचे दिसते त्यामुळे बहुजन वर्गातील लोकांच्या भावना दुखावल्याने व संतापजनक बाब असल्याचे दिसते त्यामुळे भाजपचे पदाधिकारी नेतेमंडळी यांना सत्तेचा माज आलेला आहे.त्यामुळेच बेताल वक्तव्य केले जात आहे त्यांना वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जश्यास तसे उत्तर देणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महापुरुषांनबद्दल अपमानजनक वक्तव्य करण्याची भाजपामध्ये जणूकाही स्पर्धाच लागलेली आपल्याला दिसून येते.भाजप या पक्षात देखील बहुजन समाजातील लोक कार्यरत आहे त्यांना देखील जाब विचारण्यासाठी आणि महापुरुषांची झालेली बदनामीच्या निषेधार्थ भाजपा कार्यालयावर सर्व समविचारी संघटना,पक्ष यांना घेऊन हल्लाबोल करण्यात येणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी दिली आहे.