अहमदनगर प्रतिनिधी (दि.१०.डिसेंबर):-नेवासा उड्डाणपूलावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकल्यानंतर उड्डाणपूलावरून खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी दुपारी धुळे-सोलापूर हायवेवरील धाराशिव कारखाना उड्डाणपुलावर घडली.याबाबत अधिक माहिती अशी की,संदीप कारभारी धाडगे (रा.गोंडेगाव ता.नेवासा वय ३७ वर्ष) हा तरूण पत्नी अंजली सह दुचाकीवरून मुरूम येथील नातेवाईकांकडे जात होता.दुचाकी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा येडशीच्या दरम्यान असलेल्या धाराशीव साखर कारखाना उड्डाणपुलावर आली असता, नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली व दुचाकी उड्डाणपुलावरून खाली कोसळली.या भीषण अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला.तर पत्नीच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी दुपारी गोंडेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
