अहमदनगर (दि.१९ ऑगस्ट):-राहता तालुक्यातील राहता ते साकुरी रोडवर गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखु वाहतुक करणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच कारवाई केली आहे.महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाला विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाई करत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे कलीम शहा हा त्याचे हस्तकामार्फत गुटखा, पानमसाला व तंबाखुची राहाता ते साकुरी रोडवरील पेट्रोलपंपा जवळ विक्री करीता घेवून येणार आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनिश्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन,पंचाना सोबत घेवुन खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी राहाता ते साकुरी रोडवरील पेट्रोलपंपा जवळ जावुन पाहणी करता काही इसम एका मालवाहु पॅगो रिक्षामधुन दोन इनोव्हा कार व एक स्विफ्ट डिझायर कारमध्ये गोण्या भरताना दिसले पथकाची खात्री होताच अचानक छापा घालुन आरोपी नामे १ )कलीम रहिम शहा वय ३२,रा.नांदुर्खी,ता. राहाता, २)अलीम रहिम शहा वय २९,रा.श्रीरामनगर,शिर्डी,ता.राहाता, ३)अरबाज अजीज शेख वय २३,रा. नांदुर्खी,ता.राहाता, ४) राजु हबीब शेख वय ३५,रा.श्रीरामनगर,शिर्डी,ता.राहाता, ५)अल्ताफ अब्दुल बागवान वय ३६,रा.दत्तनगर,ता. कोपरगांव अशा ५ आरोपींना मालासह ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांनी सदर माल कोठुन आणला या बाबत विचारपुस करता आरोपींनी ६) अभय गुप्ता,रा.इंदौर,राज्य मध्यप्रदेश ( फरार) व ७) प्रमोद बोथरा,रा.कोपरगांव (फरार) यांचे कडुन आणले बाबत माहिती दिल्याने आरोपींना महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ,२ इनोव्हा,१ स्विफ्ट डिझायर,१ मालवाहु पॅगो,१ ओप्पो मोबाईल असा एकुण ३८,७३,६६६/- किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन राहाता पो.स्टे.गु.र.नं. ४२२/२३ भादविक ३२८, १८८, ७२,२७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राहाता पो.स्टे.करीत आहे.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/ भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/विजय ठोंबरे,गणेश भिंगारदे,पोकॉ/रणजीत जाधव,रोहित मिसाळ व शिवाजी ढाकणे यांनी केलेली आहे.
