अहमदनगर प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची रविवारी सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेमध्ये विकास मंडळाच्या जागेवर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प विकास मंडळाने विश्वस्त गुरुमाऊली आणि आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.यासाठी सर्व सभासदांच्या बँकेच्या कायम ठेवीतून वीस हजार रुपये विकास मंडळाच्या नियोजित हॉस्पिटल साठी ठेव म्हणून वर्ग करण्याचे ठरले आहे. शिक्षकांच्या पूर्वजांनी जवळपास अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ५२ गुंठे जागा घेऊन या ठिकाणी यापूर्वी गुरुकुल नावाचे संकुल उभे केले आहे. उर्वरित जागेत हॉस्पिटल आणि कॉम्प्लेक्स बांधण्याचे नियोजित आहे या सर्वसाधारण सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहून या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे,बँकेचे चेअरमन संदीप मोटे,व्हाईस चेअरमन कैलास सरोक्ते यांसह मंडळ उपस्थित होते.
