अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१. डिसेंबर):-नगर तालुक्यातील नेप्ती येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे उमेदवार बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवारांनी गावात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.जय बिरोबा ग्राम विकास पॅनल विरुध्द श्री अनुलेश्वर वैष्णोमाता ग्रामविकास पॅनल यांच्यात अत्यंत चुरशीची निवडणुक झाली. यामध्ये जय बिरोबा ग्राम विकास पॅनलने 13 जागापैकी 7 जागांवर दणदणीत विजय संपादन केला.तर सरपंच पदासाठी सविता संजय जपकर यांनी जनतेतून मताधिक्याने विजय मिळवला.जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याबद्दल गावात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणसह रात्री उशीरा पर्यंत एकच जल्लोष सुरु होता.यावेळी युुवानेते संजय जपकर म्हणाले की आता एकच ध्यास व गावाचा विकास हेच प्रमुख सर्वांचे धोरण असेल त्यामुळे गावाला कोणताही विकास निधी कमी पडू देणार नाही.या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यासाठी संजय आसाराम जपकर,सोनाली बंडू जपकर,फारुक चांद सय्यद,अनिता दादू चौगुले,संभाजी बाळू गडाख,एकनाथ आसाराम जपकर,विमल बाबासाहेब होळकर निवडून आले आहे. यावेळी सरपंच सविता जपकर व पॅनल मधून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वाणी,युवा उद्योजक संतोष वाणी,प्रशांत शिंदे,किरण लुंगसे,अच्युत गलांडे यांनी केला.एकाच कुटुंबातील बहिण सरपंच पदासाठी व भाऊ ग्रामपंचायत सदस्यासाठी हे निवडणुकीमध्ये निवडून आल्यामुळे केवळ नेप्ती गावातच नाही तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये याची जोरदार कौतुकास्पद चर्चा सुरू आहे.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..