Maharashtra247

मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटना व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे जलसमाधी आंदोलन आंदोलकानी मारल्या धरणात उड्या

राहुरी प्रतिनिधी (दि.२२.डिसेंबर):-पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली नसल्याने आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी २१ डिसेंबर रोजी मुळा धरणात उड्या घेतल्या. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे व निधी उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शासकीय अधिकारी देत आहेत. शेतकऱ्यांना भरपाई कधी देणार? यावर अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणात उड्या घेतला.धरणात उड्या मारलेल्या आंदोलकांना पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकडीने पाण्याबाहेर काढून ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टाळला.राहुरी पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह स्वाभिमानीचे रवींद्र बापूसाहेब मोरे (रा.टाकळीमियाँ),रावसाहेब रामदास खेवरे (रा.देसवंडी), भागवत निमसे (रा. देवळाली),राहुल चोथे,अब्दुल हमीद राज महंमद पटेल व सुभाष चोथे (तिघे रा. टाकळीमियाँ),विजय शिरसाठ (रा. राहुरी बु.),प्रशांत शिंदे (रा. ब्राह्मणी),विशाल तारडे (रा. केंदळ),कैलास शेळके (रा. राहुरी खु.),सुनील शेलार (रा. तांभेरे),मीनानाथ पाचरणे (रा. रामपूरवाडी),विठ्ठल सूर्यवंशी (रा.मुसळवाडी), आदी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page