व्यंकटेश मल्टीस्टेटचा दशकपूर्ती प्रवास समाजाला भरभरुन देणारा-सुबोध भावे,व्यंकटेश मल्टीस्टेटची दिनदर्शिका व दशकपूर्ती लोगोचे प्रकाशन
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ डिसेंबर):-समाजात अर्थसाक्षरता निर्माण व्हावी तसेच सर्वसामान्यांना आर्थिक पत देण्याच्या उदात्त हेतून कार्यरत असलेल्या व्यंकटेश मल्टीस्टेटने दहा वर्षे पूर्ण केली आहेत. दशकपूर्तीचा हा प्रवास अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद घेवून आला.अनेकांना आपली संपन्नतेची स्वप्ने साकार करता आली.बुलंद भारताची निर्मिती हे संस्थेचे ध्येय खऱ्या अर्थाने समाजाला भरभरुन देणारे आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते तथा व्यंकटेश ग्रुपचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर सुबोध भावे यांनी केले.व्यंकटेश मल्टीस्टेटने तयार केलेल्या 2023 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच दशकपूर्ती लोगोचे अनावरण सुबोध भावे यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यंकटेश ग्रुपचे चेअरमन अभिनाथ शिंदे,सहसंस्थापक कृष्णा मसुरे,सहसंस्थापक व्यंकट देशमुख,सहसंस्थापक अनिल गुंजाळ,मार्केटिंग ॲण्ड डेव्हलपमेंट हेड ज्ञानेश झांबरे आदी उपस्थित होते.अभिनाथ शिंदे यांनी सांगितले की, व्यंकटेश मल्टीस्टेटची सुरुवात 10 बाय 10 च्या कार्यालयात झाली.आम्ही सगळे नवीन होतो. कोणताही पूर्वानुभव नव्हता.त्यामुळे सगळीकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या.आम्ही ध्येय निश्चित केल्यावर प्रत्यक्ष कृती केली होती.त्यामुळे आमचा आमच्यावर विश्वास होता. नकारात्मक वातावरणातही आम्ही प्रवास चालू ठेवला. चढउतार पाहिले.एक एक पायरी चढत आज शिखरापर्यंत पोहचलो आहोत.या काळात आम्ही सर्वात मोठी कमाई कोणती केली असेल तर ती म्हणजे लोकांचा विश्वास.देश सशक्त संपन्न व्हायला हवा तर प्रत्येक नागरिक संपन्न झाला पाहिजे.हेच ध्येय समोर ठेवून सामान्य शेतकरी ते देशातील बड्या उद्योजकांपर्यंत आमची नाळ जोडलेली आहे.महिला सक्षमीकरणाठी संस्थेने राबविलेल्या योजना कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत.अर्थ साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बॅंक सुरू केली. उद्योग क्रांती उपक्रमातून युवा पिढीला उद्योग, व्यवसायाकडे वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.नोकरी मागण्या ऐवजी नोकरी देणारे बना हा मंत्र संस्था युवा पिढीला देत आहे.व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व्यंकटेश फौंडेशनचीही स्थापना केली.या मार्फत आपत्ती ग्रस्तांना ओंजळभर माणुसकी अंतर्गत धान्य वाटप केले.याशिवाय गोशाळा चालवून शेतकऱ्यांपर्यंत सेंद्रिय शेती,गोपालनाचे महत्व पोहोचविले.त्याचे अतिशय चांगले परिणाम पहायला मिळत आहेत. या काळात संस्थेला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. एकूणच देशाच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलता येतोय याचे खूप समाधान आहे. भविष्यातही अशीच वाटचाल सुरू ठेवली जाईल.संस्थेच्या यशस्वी वाटचालीत माझे सर्व सहकारी तसेच अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे.नवीन वर्षाची दिनदर्शिका सर्व सभासद, ग्राहकांना मोफत वितरित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.