बारा लाख ८१ हजार रुपये किमतीची लोखंडी स्टील चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी केली गजाआड
राहुरी प्रतिनिधी (दि.२२. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारातील तांबे पेट्रोलपंपा शेजारील १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीची लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी गजाआड केली आहे.बातमीची हकीकत अशीकी राहुरी पोस्टे गु.र.नं/१९५६/२०२२ भादविक/३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक व श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर यांनी पोनि/प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री/प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई/खोंडे,सफो/चंद्रकांत ब-हाटे,पोहेकॉ/दिनकर चव्हाण,पोहेकॉ/सोमनाथ जायभाय,पोना/अमित राठोड,पोकॉ/अदिनाथ पाखरे,पोकॉ/सचिन ताजणे पोकॉ/संतोष राठोड,पोकॉ/गणेश लिपणे,पोकॉ/नदिम शेख,पोकॉ/अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमले होते.सदर घटनेबाबत पोनि/प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १)अभिषेक बाबासाहेब हुडे २)हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा.उंबरे ता.राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे.अशी गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३)जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४) छोट उर्फ सौरभ संजय दुशिंग ५) राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता.राहुरी जि.अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे.सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक, अ.नगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री.संदिप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.