अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२.डिसेंबर):-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर व प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 21 डिसेंबर २०२२ रोजी प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान अहमदनगर येथे मानवी हक्क, अँसिड हल्ल्यातील पीडितांचे अधिकार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती भाग्यश्री पाटील,सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,अहमदनगर या होत्या.त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्यावर होणारे संस्कार आणि संस्कृतीचा ठेवा या दोन्ही बाबी आपण जपल्या पाहिजेत,असे सांगून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी सोप्या भाषेत सांगितल्या.श्रीमती.अंजली केवळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श तसेच बालकांवर होणारे अत्याचार त्याबाबतचे कायदे या विषयी माहिती दिली.श्री.सुनील मुंदडा, सदस्य,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी मानवी हक्क व कायदे याविषयी बोलताना विद्यार्थ्यांना प्रकृती, संस्कृती व विकृती यावर उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री सुनील पंडित प्राचार्य प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी केले.सर्व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती आशा मगर यांनी केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अँड श्री. भूषण बराटे अँड.श्री अभय राजे व अँड. श्रीमती. स्वाती नगरकर, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर हे उपस्थित होते. अँड. चैताली खिल्लारी तसेच मोहटा देवी ट्रस्टचे विश्वस्त अँड. विक्रम वाडेकर हे कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. सुष्मा नगरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे श्री.स्वप्निल परदेशी,श्री.विकास कर्डिले व श्री विलास दिघाडे यांनी सहकार्य केले.
Trending Topics:
Trending
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
- इचलकरंजीत सावरकर चषक जलतरण स्पर्धेत कराडच्या पठ्ठ्यांचा धमाका! थेट सुवर्ण,रौप्य अन् कांस्य पदकांची लूट!कराडच्या अर्णव,तनवीरा अन् रुद्रांशचा राज्यस्तरीय स्पर्धेत जलवा!
- 🏆लातूरमध्ये मलकापूरचा डंका! रोटरी क्लबने एकाच रात्री पटकावले तब्बल १३ मानाचे पुरस्कार..
- 🚨थरारक! कराडच्या ‘या’ रस्त्यावर अवघ्या १० मिनिटांत ७-८ दुचाकीस्वार घसरले..ट्रकच्या चाकाखाली जाता-जाता वाचले प्राण..! नागरिकांचा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा..
- मोठी बातमी..अहिल्यानगरकरांचे बोअरवेल कधीच आटणार नाहीत? महापालिकेला मिळाला ‘हा’ मास्टरप्लॅन!वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य तुलसीराम पालीवाल यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले पत्र..
