
अहमदनगर (दि.२६ जानेवारी):-जन परिवर्तन ट्रस्ट अहमदनगरच्या वतीने २६ जानेवारी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महिला कायदेविषयक जागृती संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या खजिनदार शकुंतला बोरुडे या होत्या तर प्रमुख पाहुण्या गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच मीराबाई भाऊसाहेब आव्हाड होत्या,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अहमदनगर येथील मदत फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनाश्रीताई अहिरे व संस्थापक अध्यक्ष जन परिवर्तन ट्रस्ट ॲड.लक्ष्मण बोरुडे हे होते.यावेळी महिलांना कायद्याविषयी माहिती देताना महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षणाचा कायदा हुंडाबळी कायदा तसेच पोटगी मागण्याचा हक्क कायदा या तीन वेगवेगळ्या कायद्याविषयी उपस्थित महिलांना सखोल असे मार्गदर्शन केले.
ॲड.मोनाश्री अहिरे यांनी घरगुती हिंसाचार तर ॲड.बोरुडे यांनी हुंडाबळी व पोटगी या विषयावर बोलताना उपस्थित महिलांना येणाऱ्या अडचणी विचारून त्यावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमा प्रसंगी गावातील ग्रामस्थ तरुण तसेच महिला मोठ्या प्रमाणे सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्तविक ॲड.लक्ष्मण बोरुडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे तसेच उपस्थित महिला व नागरिकांचे आभार लोकनियुक्त सरपंच मीराताई भाऊसाहेब आव्हाड यांनी मानले.हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या प्रसंगी मंदा नागरे,तुतारे मॅडम, आरोग्य सेविका अहिरे मॅडम, अंगणवाडी सेविका इंदुताई आव्हाड,भाऊसाहेब आव्हाड, आजिनाथ आव्हाड,अमोल आव्हाड,दिलीप आव्हाड, पांडुरंग नागरे,गोटू आव्हाड, इ.उपस्थित होते.