
अहमदनगर (दि.२७ जानेवारी):-एमआयडीसी हद्दीतील शेंडी परीसरातुन विनापरवाना गावठी कटटा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशिकी,
दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की शेंडी बायपास चौक शेंडी शिवार येथे एक इसम बेकायदेशिरपणे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस बाळगत आहे.
त्यावरुन सपोनी/चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन आरोपीला शेंडी बायपास चौक शेंडी शिवार येथे सापळा लावुन पकडले.त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव संदिप दिलीप भालेराव (रा.खोसपुरी ता.जि.अहमदनगर) असे सांगितले, तयाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा एकुण २६०००/-रु.किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याच्या विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोकॉ/किशोर सुभाष जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुरन ७२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन सपोनि/ माणिक चौधरी,पोहेकॉ/नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ/ रमेश थोरवे,पोहेकॉ/राजु सूद्रिक,पोना/किष्णु भागवत, पोकॉ/किशोर जाथव,पोकॉ, नवनाथ दहिफळे,पोकॉ/ भगवान वंजारी,पोकॉ/सचिन हरदास,पोकॉ/उमेश शेरकर, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.