अहमदनगर प्रतिनिधी (दि.४.जानेवारी):-महावितरणचे खाजगीकरण न करण्यास महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून या महावितरण कंपनीच्या कृती समितीच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना अखिल भारतीय छावा संघटनेचे महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत छावा संघटनेचे पश्चिम युवक सचिव दत्ताभाऊ वामन,मुन्ना सय्यद,विलास कराळे, रावसाहेब काळे,सुनील सकट,अशोक भोसले,सुशील जाधव,सुभाष आल्हाट, दीपक साळवे,पठाण मॅडम आदी उपस्थित होते. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने महावितरण कृती समितीने जो बंद खाजगीकरणाच्या विरोधामध्ये पुकारलेला आहे त्यामध्ये अदानी पावर या भांडवलदारांच्या भिकेला आपल्या महाराष्ट्र सरकारने दबावाला बळी न पडता महाराष्ट्रातील तमाम जनतेला ठेकेदारांच्या दावणीला न जुमानता व शेतकरी कामगारांच्या हितासाठी कंपनीस महाराष्ट्र मध्ये कॉन्ट्रॅक्ट न देता महाराष्ट्र सरकारने या सर्वांना सहकार्य करावे तसेच कंपनी कुठल्याही प्रकारची तोट्यात नसतानाही महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे जाणीवपूर्वक अडचणीत आणून अदानींना देऊ नये असे झाल्यास त्याचा परिणाम हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा विस्कळीत झालेला असुन हा विषय ठाणे जिल्ह्यातील असला तरी याचा तोटा व परिणाम हा नगर जिल्ह्याला आत्ताच जाणून लागलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सामान्य कामगार शेतकरी वंचित व गरिबांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे तसेच कंपनीचे खाजगीकरण केल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागेल अनेक कामगारांचा रोजगार बुडणार असून तरी सदर कंपनी ही जनतेला लुटण्याचेच काम करील तेव्हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला न्याय देण्याचे काम करावे अशी अहमदनगर जिल्हा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली असून महाराष्ट्र महावितरण कंपनी कृती समितीच्या मागण्या त्वरित मान्य करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा 26 जानेवारी 2023 रोजी पासून महाराष्ट्रभर जन आंदोलन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
