नगर प्रतिनिधी (दि.४.जानेवारी):- मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पंडीत यांची नाशिक पदवीधर मतदार संघाचे इच्छुक उमेदवार ॲड.धनंजय जाधव यांनी भेट घेतली.अनेक वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे.शिक्षकांच्या या प्रश्नांसोबतच सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यास अग्रक्रम देणार असल्याचा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाकडुन इच्छुक उमेदवार ॲड.धनंजय जाधव यांनी दिला.जाधव यांनी अहमदनगर शहरातील विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला.नाशिक पदवीधर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ असून प्रचारासाठी दिवस कमी आहेत.त्यामुळे निवडणुकीतील विजयाची सर्व मदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आहे.प्रत्येक पदाधिकारी हा दिवसरात्र झटत आहे.आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याची गरज आहे.प्रत्येक मतदाराला त्यांच्या समस्या सोडविण्याचा विश्वास द्या,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न असो की अन्य प्रश्न असो, प्रत्येक शिक्षकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील,असा विश्वास पंडित सर यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना दिला.याप्रसंगी विश्व हिंदु परीषदेचे जिल्हा सहमंत्री गौतम कराळे,भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष स्वप्निल दगडे आदी यावेळी उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
